Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा

Ravikant Tupkar :  लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (6 जुलै) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत म्हटलं की, जरी लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो, तरी जनतेच्या मनात आपण जिंकलेलो आहोत. आपल्याला अडीच लाख मत पडली आहेत. प्रतापराव जाधव हे कागदावर जरी जिंकले असले तरी ते जनतेच्या मनातून हरले आहेत, जनतेचा कौल आपल्या सोबत असल्याने आता आपल्याला पराभवाला खचून न जाता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढायची आहे. आणि उद्यापासूनच आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागायचं आहे, असे आवाहन केले. 

स्वाभिमानी सोडली आहे का? तुपकर काय म्हणाले?

रविकांत तुपकर यांनी बुलढाणामध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढणार असून लवकरच पुण्यात कार्यकारिणीची बैठक होईल, यामध्ये राज्यातील कोणत्या जागा लढायच्या याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही आघाडीत जाण्याचा प्रश्न नाही, आम्ही स्वतंत्र लढत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी सोडली आहे का? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढत असल्याचे ते म्हणाले.

Washim News : पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ

राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू असून कालच आमदार बच्चू कडू यांच्याशी याबाबत चर्चा झाली. अजून काही घटक तिसऱ्या आघाडीसाठी आग्रही असल्यासही रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की मला उठलं, सुटलं नोटीस पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा म्हणतात. मी काय दरोडा टाकला आहे का? अशी विचारणा तुपकर यांनी केली. 

माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आले

ते म्हणाले की, मी या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असूनही पक्षाविषयी जास्त मत घेतली. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यांनी विचार करावा. इमानदारीने वागत असल्याने गेल्या 22 वर्षांपासून माझ्यासोबत लोकं टिकून असल्याचे म्हणत एक प्रकारे राजू शेट्टी यांना टोला लगावला. मी जर लोकसभा निवडणूक लढवली नसती, तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती. माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आले. आता अर्थसंकल्पात आले. त्यामुळे चुका दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply