Ratnagiri News : शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; रत्नागिरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

Ratnagiri News : शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे कोंड गावात सोमवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली. तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८) आणि स्मित वासुदेव आंबेकर (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

स्मित हा अंगणवाडीत शिकत होता. तर तनिष्क हा पहिलीत शिकत होता. सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास दोघेही आपआपल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले. मात्र, शाळेत न जाता त्यांनी थेट धरण परिसरातील नदीपात्र गाठले.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंवर दबाव होता; स्वतःला वाचवण्यासाठी पक्ष फोडला... संजय राऊतांचा सर्वात गंभीर आरोप

नदीपात्राकडे जात असताना गावातील एका व्यक्तीने त्यांना हटकलं. परंतु, दोन्ही चिमुकले ग्रामस्थाची नजर चुकवून पुन्हा धरणाच्या दिशेने गेले. नदीपात्रात असलेलं पाणी पाहून दोन्ही चिमुकल्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या.

मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. यावेळी फणसवळे कोंड गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी चिमुकल्यांना बुडताना पाहिले. दोघांनीही चिमुकल्यांना वाचवण्यासाठी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली.

परंतु अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडाली होती. लोंढे आणि आंबेकर यांनी चिमुकल्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. दोघांनीही चिमुकल्यांची शोधाशोध केली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply