Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश

Ratnagiri : समुद्री चाच्यांनी एमव्ही बिटू रिव्हर या जहाजावर हल्ला करुन बंधक बनवलेल्या १० खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. बंधक असलेल्या या दोघांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील कुटुंबांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे.

समुद्री चाच्यांनी एमव्ही बिटू रिव्हर या जहाजावर १७ मार्च २०२५ रोजी रात्री पावणेआठ वाजता मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून ४० नॉटिकल मैल आग्नेय दिशेला हल्ला केला. यामध्ये १० खलाशांना बंधक बनवण्यात आले. त्यामध्ये ७ भारतीय आणि ३ रोमानियन नागरिक आहेत.

Ratnagiri https://punenews24.in/latest-news/ratnagiri-6/

या खलाशांमध्ये रत्नागिरी येथील दोन तरुण असून, त्यात मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने जावेद हसनमिया मिरकर आणि शब्बीर अ. लतीफ सोलकर यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून त्या दोघांना सोडविण्याची मागणी केली आहे.

मागील दहा दिवसांपासून मुलांच्या सुरक्षिततेबद्दल माहिती मिळालेली नाही. त्यामूळे सर्व संबंधित व्यक्तींसह परराष्ट्र मंत्रालय, डीजी शिपिंग आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी तातडीने संपर्क साधून खलाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी त्या दोघांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply