Ratnagiri News : रत्नागिरीतून १३ बांगलादेशींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोकणात कसे पोहचले?

Ratnagiri : रत्नागिरीतील चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केलीय. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालरकोंडवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. या परिसरात बांग्लादेशी राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्व बांगलादेशी आसिफ सावकार यांच्या नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर जून २०२४ पासून राहत होते.

१३ बांगलादेशी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये काम करत आहेत. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय, बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीने भारतात आले आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद‌विरोधी पथकाने ही कारवाई केली. या सर्व बांगलादेशीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलिस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही कामगिरी केलीय.

Mathura Refinery Blast : इंडियन ऑइल रिफायनरीमध्ये स्फोट, १२ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती चिंताजनक

वहीद रियाज सरदार (३५ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखीरा, कलारोवा), रजाऊल हुसेन करीकर (५० वर्षे, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), शरीफुल हौजीआर सरदार (२८ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (५० वर्षे, रा. तहसील कैबा, जि. सातखिरा), हमीद मुस्तफा मुल्ला (४५ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), राजू अहमद हजरतअली शेख (३१ वर्षे, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), बादबिल्ला अमीर हुसेन सरदार (२९ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सान कलारोवा), सैदूर रेहमान मोबारक अली (३४ वर्षे, रा. पसल कलारोवा, जि. सातखीरा), आलमगीर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४ वर्षे, रा. पाईकपरा, पो. कामाराली, जि. साथखिरा), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (३२ वर्षे, रा. बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८ वर्षे, रा. बाशबरी, जि. जसोर), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५ वर्षे, रा. बराली, जि. सातखिरा), मोहम्मद लालटू मोंडल, सन ऑफ किताब अली (३७ वर्षे, रा. बराली, जि. सातखिरा), अशी या बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply