अल्माटी : मानांकन कुस्ती स्पर्धा : पाच वर्षांनंतर साक्षीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण

अल्माटी : भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने पाच वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचा दुष्काळ शुक्रवारी संपवला. तिने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेच्या मानांकन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या मानसी व दिव्या काकरन यांनीही सुवर्ण कामगिरी केली.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत प्रकाशझोतात आलेल्या साक्षीला त्यानंतर कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र, नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत तिने चांगली कामगिरी केली. त्यापाठोपाठ तिला ‘यूब्ल्यूब्ल्यू’ मानांकन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले.

६२ किलो वजनी गटातील अंतिम लढतीमध्ये साक्षीने आक्रमक शैलीत आणि चपळाईने खेळ केला. या लढतीत सुरुवातीला तिची प्रतिस्पर्धी इरिना कुझनेत्सोव्हाकडे ५-३ अशी आघाडी होती. मात्र, साक्षीने जोरदार प्रतिहल्ला केला आणि ७-४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर साक्षीने कुझनेत्सोव्हाला चितपट करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply