Ratan Tata : मागील ११ महिन्यांत महाराष्ट्र बनला नंबर 1; रतन टाटांना उद्योगरत्न जाहीर करताना उदय सामंतांनी केले स्पष्ट

मुंबई - राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे मागील ११ महिन्यांत १८ लाख ४२२ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

तसेच, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर केला असून, पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Ratnagiri Flood : रत्नागिरीत पावसाचा हाहाकार; मुंबई-गोवा मार्गावर कोसळली दरड, प्रसिद्ध पीर बाबरशेख दर्ग्यात शिरलं पाणी

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन केलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे ‘महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक’ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेला सामंत यांनी उत्तर दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply