Ramdas Athawale : लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तर...; रामदास आठवलेंनी भूमिका केली स्पष्ट

Ramdas Athawale : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'आता वातावरण चांगलं आहे. मला शिर्डीतून निवडून येण्याची संधी आहे. मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तरी, मी एनडीएमधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.

आम्ही ४०० जागा जिंकू : रामदास आठवले

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आज शनिवारी रामदास आठवलेंनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, 'मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि एप्रिलमध्ये निवडणुका होतील. आम्ही 400 जागा जिंकू. अलीकडे झालेल्या पाचही राज्यात भाजपला चागलं यश मिळालं. मागच्या वर्षात केलेली काम, महिलांसाठी केलेली काम, 370 कलम हटवण्याचं काम केलं. तसेच आणखीही कामे करण्यात आलेली आहेत'.

Bacchu Kadu On BJP : 'थाेडा थाेडा अनुभव आम्हांलाही येतोय'; जानकरांच्या विधानानंतर भाजपवर बच्चू कडू स्पष्टच बाेलले

आम्हाला एकतरी जागा सोडावी : रामदास आठवले

'विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिलो आहोत . एनडीएने आम्हाला एक जागा तरी सोडावी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला होता. आमच्या पक्षाला विसरून चालणार नाही. त्यामुळे माझी लोकसभेसाठी शिर्डीच्या जागेवरून उभे राहण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply