Ramayana Mahotsav : ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन

Ramayana Mahotsav : अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडणार आहे. तसंच या दिवशी राम मंदिराचं लोकार्पणही केलं जाणार आहे. यामुळे संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. सगळीकडे हा जल्लोष साजरा केला जातोय. सर्वजण आपापल्या परीने या सोहळ्यात सहभागी होत आहेत.

यानिमित्तानेच ठाण्याच्या गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आज या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. ठाणे शहर भाजपातर्फे या रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 

रामायण महोत्सवात काय काय आहे

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात हा रामायण महोत्सव पार पडणार आहे. या रामायण महोत्सवांमध्ये राम मंदिराचा पाचशे वर्षांचा प्रवास हा कमी शब्दांत पोस्टर्सद्वारे लावण्यात आलाय.

तसंच रांगोळीच्या माध्यमातूनही रामायणाचा इतिहास दाखवण्यात आलंय. विशेष भाग म्हणजेच राम मंदिराची प्रतिकृती व त्यासोबतच काही सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. सर्व भक्तांसाठी हा महोत्सव म्हणजे भक्तिमय मेजवानी आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, लोणावळ्यात जय्यत तयारी; २०० एकर मैदान केलं जातंय सपाट

ठाणेकरांसाठी रामायण महोत्सव

अयोध्यामध्ये २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यानिमित्तानेच ठाणेकरांसाठी रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा महोत्सव २० ते २२ जानेवारी दरम्यान होत आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात भाजपने रामकथा, रामायण महोत्सव, महाआरती, दीपोत्सव या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply