Ram Shinde : राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड

Ram Shinde : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली.

एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. सर्व आमदारांनी राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर राम शिंदे हे सभापती पदाच्या खुर्चीवर बसले. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपनं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Sangli District Bank : जिल्हा बँकेकडून कर्जदारांना जप्तीची नोटीस; वसुलीसाठी सांगली जिल्हा बँक ऍक्शन मोडवर

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शि्ंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभेतील पराभवानंतर राम शिंदे नाराज झाले होते. त्यानंतर आता त्यांची विधान परिषदेच्या सभापती पदी वर्णी लागली आहे.

राम शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ते धनगर समाजाचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. २०१४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. यापूर्वी त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply