Ram Mandir News : राम मंदिरावर हल्ला होणार असल्याचा मुंबई पोलीस कंट्रोल रुमला फोन, सर्व यंत्रणा सतर्क

Ram Mandir News : उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा  काही दिवसांपूर्वी पार पडला. मंदिराचं लोकार्पण देखील करण्यात आलंय. त्यामुळं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या आनंदावर विरजन टाकणारी एक बातमी समोर येत आहे. त्यामुळं सगळीकडे पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

भव्य राम मंदिरावर हल्ला होणार असल्याची माहिती मुंबई नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. आता राम मंदिरावर हल्ला होणार असल्याची माहिती मिळतेय. याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

“मी आजपर्यंत कधीही काही मागितलेलं नाही..”, अजित पवार यांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

राम मंदीरावर हल्ला होणार असल्याची माहिती

उत्तर प्रदेशातील भव्य राम मंदीरावर हल्ला होणार असल्याची मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली होती. सोहम पांडे नावाच्या व्यक्तीनं मुंबई नियंत्रण कक्षाला शनिवारी मध्यरात्री फोन करून ही माहिती दिली होती. सोहम पांडेचा मित्र नंदकिशोर सिंग हा आरपीएफचा स्टाफ आहे.

नंदकिशोर सिंग हा आग्रा ते मुंबई प्रवास करत होता. तेव्हा आग्रा अदपतपुर येथील रहिवाशी सोहेल कुरेशी हा राम मंदीरावर हल्ला करणार असल्याची माहिती त्याला समजली होती. दरम्यान सोहम पांडे याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने संबधित सर्व यंत्रणांना याची माहिती देत सतर्क केलं आहे. हा फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीबाबत पोलीस खात्री करत आहेत. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

अयोध्येत काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी हजारो प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावलीय. त्यानंतर मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं झालं आहे. राम मंदिर (Ram Mandir) बघण्यासाठी आपल्या लाडक्या रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांनी अयोध्येत गर्दी केली आहे. श्रीराम प्रभूचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.

काही गैरप्रकार घडू नये, भाविकांची काही गैरसोय होऊ नये म्हणून अयोध्येत काळजी घेतली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या योग्य उपाययोजना देखील अयोध्येत करण्यात आल्या आहेत. मंदिरावरील धमकीच्या फोनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply