Ram Mandir : 'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले'; अयोध्येत लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार असून आजपासून पूजा विधी सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकले आहेत. राम घाट परिसरात एकनाथ शिंदे यांचे हे झळकलेले फ्लेक्स दिसून आले आहेत. फ्लेक्सवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे यांचे देखील फोटो आहेत.

राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले. 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेजी की कामना हुई पुरी' असा मजकूर लिहिलेले अनेक फ्लेक्स अयोध्येतील रामघाट परिसरात उभारण्यात आलेले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

Political News : काँग्रेस पक्षाला हिंदू समाज त्यांची जागा दाखवणार; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भगवंत खूबा यांचं टीकास्त्र

महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक रामभक्तांचे डोळे आपोआप या फ्लेक्सकडे वळतायत. नेमके हे फ्लेक्स कोणी लावले हे समजू शकलेलं नाही. तरी या मजकुरातून समोर आलेली भावना ही एका शिवसैनिकाचीच असेल असं मानलं जातंय. राम मंदिराच्या उद्घाटना आधी राजकीय वातावरण देखील रंगू लागलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply