Rajya Sabha : अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, राणेंचा पत्ता कट

Rajya Sabha : भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांची नावे आहेत. महाराष्ट्रातून अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मंत्री नारायण राणे यांना पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे नाव देखील यादीमध्ये नाहीये. 

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र, आज तीन नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते.

Maratha Reservarion : टायर पेटवून केला रास्ता रोको; धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक

राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपतर्फे विनोद तावडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भांडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर या नेत्यांचे अर्ज तयार करण्याचे काम सुरू केलं होतं. यांपैकी अंतिम उमेदवार कोण हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित होणार होतं.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजपच्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत. महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते राज्यसभेचे खासदार होण्यासाठी इच्छुक होते. त्यातच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांचेदेखील नाव आघाडीवर होते.

महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेच्या उमेदवार म्हणून निश्चित केलेले आहे. त्यांची राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांनी पुणे महापालिकेत त्यांनी ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केले जाते.

दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये टिळक घराण्यातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपकडून ब्राह्मणांना गृहीत धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटका देखील या निवडणुकीमध्ये बसल्याने रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply