Raj Thackrey : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवलं, आपल्याला काय उपयोग?, खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी

Raj Thackrey: हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थ्यांचे मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेले खड्डे यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्या राज ठाकरे बोलत होते.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला कळत नाही ते चांद्रयान चंद्रावर का पाठवलं आहे. चांद्रयानाचा आपल्याला काय उपयोग आहे. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत तर ते यान महाराष्ट्रात सोडायचं ना.

राज्यातील लोकांचं मला कौतुक वाटतं. २००७-०८ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. आतापर्यंत येथे १५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. पण रस्ता आहे तसाच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

भाजपला टोला

एवढी सरकार आल्यानंतरही खड्डे आहे तशीच आहेत. तुम्ही मतदान करता कसं या लोकांना. यांना धडा शिकवावा असं कधी तुम्हाला वाटत नाही का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

अमित जात असताना काही कारणास्तव मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला. तेव्हा भाजपाने टीका केली. भाजपाने लोकांचे आमदार न फोडता पक्ष बांधायला पण शिका, अशी टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply