Raj Thackeray News : 'मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण? कालांतराने समोर येईलच...' मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंचे मोठे विधान

Raj Thackeray News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून सध्या त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. जरांगेच्या पाठीशी कोण? हे लवकरच स्पष्ट होईल.. असे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन सध्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Vitthal Mandir Pandharpur : विठ्ठल भक्तांसाठी आनंदवार्ता ! कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला, आजपासून देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष  राज ठाकरेआज (गुरूवार) ठाणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन मोठे विधान केले आहे. अशाप्रकारे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असे काही घडणार नाही हे मी आधीच त्यांच्या समोर स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले.

तसेच "यामागे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागे कोण आहे? ज्यामधून जातीयवादातून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा प्रयत्न आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे घडत असून दिसतयं इतकं सरळ चित्र नाही यामागे कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल.." असेही राज ठाकरे म्हणाले.

अमित शहांवर टीका...

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यास रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले होते. शहांच्या या वक्तव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपने टूर्स एन्ड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडलं असावं.. असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply