Raj Thackeray : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

Mumbai  : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तरुणीवर हल्ला झाल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या लेशपाल जवळगेचं देखील राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. तसेच राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांनाही अशा घटना घडताना दिसल्यास वेळेत धावून जा, अशा सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस 25 जूनला जालना दौऱ्यावर; 'शासन आपल्या दारी'च्या कार्यक्रमात लावणार हजेरी

 

राज ठाकरेंनी काय म्हटलं?

काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं.

अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. 

सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply