Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त सारसबाग परिसरात वाहतूकबदल…काय आहे व्यवस्था ?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त शुक्रवारी (१० मे) दुपारी चारनंतर सारसबाग परिसरात वाहतूकबदल करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग परिसरात आयोजन करण्यात आले आहे. सभेस होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावरून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

Ajit Pawar : विकास करण्यासाठी महायुतीत, मी सत्तेला हापापलेलो नाही; सत्ता येते, सत्ता जाते – अजित पवार

सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे. बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, सावरकर पुतळा चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चाैकमार्गे इच्छितस्थळी जावे. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्ता, शंकरशेठ रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply