Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे; मनसैनिकांना दिल्या महत्त्वाचे सूचना

Raj Thackeray : नाशिकमध्ये पार पडलेल्या वर्धानदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पक्षाची वाटचाल आणि पुढील दिशा कशी असणार याबाबत आपली भूमिका मांडली. तसेच पक्षाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनांचा पाढा वाचताना सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलं. गेल्या १८ वर्षात पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेत. पक्षाला जास्त उतारच पाहिले. या सर्व उतारामध्ये मला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

१) मला माझया कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय चाललंय दुसऱ्याची पोरं कड्यावर घेऊन फिरवून जो आनंद मिळवताहेत, तसलं सुख नकोय

Pandharpur Crime News : पंढरपुरात पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

२) खरे पक्ष जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर मनसे...याच्यात ९९ टक्के यातील लोकांचा कुणाचा राजकारणाशी संबंध नव्हता.

३) मनसेत हजारो तरूण नावारुपाला आलेत. तुमच्यातले अनेक आमदार, नगरसेवक होतील. या सगळ्यात पेशन्स महत्वाचा आहे.

४) अनेक मनसैनिकांनी मराठी माणसासाठी माझ्यासकट तुरुंगवास भोगला.

५) अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक का नाही झालं.? पंतप्रधान आले पण पुढे काय झालं...?

६) मनसेने आंदोलने केली. त्याचा शेवट झाला. टोलनाके बंद झाले. जवळपास ६७ टोलनाके बंद झाले.

७) भोंगे बंद झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने १७ हजार मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.

८) एकदा राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करतो...बघू कुणात हिंमत आहे भोंगे लावण्याची.

९) मुंबई-गोवा रस्ता, नाशिक रस्ता भीषण झालाय. टोल वसूल करतात, रस्ते नीट नाहीत.

१०) ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. कोण कुठे आहे हेच कळत नाही.

११) गेल्या १८ वर्षांत आपल्यावर इतके आरोप केले तितके कोणत्याही राजकीय पक्षावर झाले नाहीत.

१२) पाच नगरसेवक भेटायला आले. ..आम्ही राष्ट्रवादीचे असे सांगितले. त्यातले ३ शरद पवारांचे म्हणाले. दोन म्हणाले अजित पवारांचे. मला ठाम माहीत आहे अजून सगळे एकत्र आहेत. ते तुम्हाला वेडे बनवतात.

१३) महाराष्ट्र एकसंघ राहू दे यासाठी जातीचं विष पसरवलं जातं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply