यंदा देशात सरासरी ९६ टक्के, तर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

पुणे – नैऋत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के (+/- ५%) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मान्सून हंगामाबाबतचा अधिकृत अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला असून, यावेळी ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मान्सूनच्या उत्तरार्धात ‘एल निनो’चा प्रतिकूल प्रभाव राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचेही आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने नुकताच मान्सून हंगामविषयक अंदाज प्रसिद्ध केला असून, सरासरीच्या ९४ टक्केपर्यंत पाऊस होईल, असे भाकीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आयएमडीचा अधिकृत अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply