Railway News : रेल्वे स्टेशनवर करत होते अनाधिकृत व्यवसाय; फेरीवाल्यांवर मध्य रेल्वेची बंपर कारवाई !

Railway News : रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या सहा महिन्यांत अनधिकृत फेरीवाल्याविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २१ हजार ७४९ गुन्हे नोंदविण्यात आले असून २१,७३६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.७२ कोटींचा दंडही वसूल केला आहे.

न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करून १५० मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, रेल्वेने सीमारेषा आखली होती. तरीही नियम तोडून अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत आहेत.

Udhav Thackeray : “भाजपाचं सरकार आणा अन् रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या”, अमित शाहांच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

मध्य रेल्वेकडून अनेकदा या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असली तरी त्यांच्यावर अंकुश लावण्यात रेल्वेला यश आले नाही. याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मोहीम राबवली.

या मोहिमेंतर्गत ट्रेनमध्ये २१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ फेरीवाल्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवलेल्या १७ हजार ९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply