Railway Budget 2026 : मुंबई–पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणाऱ्या 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन; रेल्वे नेटवर्क विस्ताराची अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

New Delhi : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचे नववे अर्थसंकल्प सादर करत असून 2026साठी देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती या वरून ठरणार आहे. संसदेत त्यांचं भाषण सुरू होताच, निर्मला सितारामन यांनी भारतात 7 नवे हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर सुरू करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत देशातील रेल्वेच्या जाळ्या मोठी सुधारणा होणार आहे.

अर्थमंत्री यांनी यंदाचं अर्थसंक्लपाच्या भाषणाची सुरूवात करताना केंद्र सरकाच्या पायाभूत सुविधांचा आराखडा सादर केला. त्यावेली त्यांनी देशात 7 नवे वेगवान आणि पर्यावरणपूर्व रेल कॉरिडोर सुरू करण्याची घोषणा केली. रेल्वे नेटवर्कचा विस्तार होऊन यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

"सरकार सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरद्वारे पर्यावरणास अनुकूल प्रवासी वाहतूक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव देत आहे," असे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीतील भाषणात सांगितले. यामध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे, कारण मुंबई ते पुणे हाय स्पीड रेल्वेचा या सात रेल्वे कॉरिडोरमध्ये समावेश आहे.

Rupali Patil : अजित दादांचे मूळ दोन्ही पायलट उशिरा का आले? अचानक पायलट बदलले गेले; अपघात की घात? रुपाली पाटलांचे गंभीर सवाल

सर्व सात रेल्वेची यादी पाहा
मुंबई–पुणे
हैदराबाद–बंगळूरू
दिल्ली–वाराणसी
वाराणसी–सिलिगुडी
पुणे–हैदराबाद
हैदराबाद–चेन्नई
चेन्नई–बंगळूरू

हे सात हाय-स्पीड रेल मार्ग देशातील सर्व प्रमुख महानगरांना वेगाने वाढणाऱ्या शहरांशी जोडणार आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि रस्ते व पारंपरिक रेल्वे जाळ्यांवरील ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर एक हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर उभारण्याचं काम सुरू आहे. हा प्रकल्प 508 किमी लांब आहे. हा देशातील एकमेव असा रेल्वे मार्ग आहे जिथून 320 किमी प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावण्याची क्षमता आहे. हा रेल्वे मार्ग गुजरात, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली या भागांमधून जाणाार आहे. हे संपूर्ण अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.

स्वतंत्र मालवाहतूक मार्ग
यासोबतच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात एक स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडोर उभारण्याची घोषणासुद्धा केली आहे. हा मार्ग देशातील पूर्व ते पश्चिमेमधील राज्यांना सहजपणे जोडणार आहे. पूर्वेतील डांकुणी ते पश्चिमेमधील सुरतपर्यंत हा मालवाहतूक मार्ग उभारला जाणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Railway Budget 2026 : मुंबई–पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणाऱ्या 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन; रेल्वे नेटवर्क विस्ताराची अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *