Railway Accident News : रेल्वे अपघातात कुत्र्यासह मालकाचा मृत्यू; छ्त्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना

 

Railway Accident News : कुत्र्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वकिलाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील संग्राम नगर उड्डाणपुलाखाली ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कासलीवारपुरम सोसायटीचे अध्यक्ष वकील लांडगे हे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले. कुत्र्यासह ते थेट संग्राम नगर उड्डाणपुलाखाली आले होते. येथे असलेल्या रेल्वे रुळांजवळ ते फिरत होते.

त्याच दरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला. चिकलठाणा कडून ट्रेन येत होती, वकील भाऊसाहेब यांनी ट्रेन येत असल्याचे पाहून रेल्वे रुळ झटकन क्रॉस केला. मात्र कुत्रा मागेच राहिला होता. कुत्रा तेथेच राहिला तर त्याचा जीव जाईल. त्यामुळे त्याला घेण्यासाठी भाऊसाहेब मागे वळले.

Mumbai News : लोकसभेतील नरेटीव्ह खोडण्याचा भाजपचा प्रयत्न! सर्व ITI कॉलेजमध्ये उभारणार 'संविधानाचे मंदिर'; मंगल प्रभात लोढांची घोषणा

तोपर्यंत रेल्वे जवळ आली होती. यात त्यांच्या डोक्याला रेल्वेचा मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर कुत्रा सुद्धा ट्रेनखाली चिरडला गेला. एकाचवेळी मालक भाऊसाहेब लांडगे आणि त्यांच्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतलेत.

रेल्वेचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे रेल्वे रुळांवर फिरू नये अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दिल्या जातात. मात्र तरिही काही व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालत अशा पद्धतीने वावरतात. रेल्वे प्रवासात सुद्धा ब्रिज आणि पुलांचा वापर करावा असे सांगितले जाते. मात्र पटकन फलाट क्रमांक बदलण्यासाठी काही व्यक्ती रेल्वे रुळांवरून क्रॉस करतात. अशा घटनांमध्ये सुद्धा अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply