Raigad Khalapur Landslide : रायगडमध्ये माळीणसारखी दुर्घटना, खालापूरमध्ये दरड कोसळली; अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली

Khalapur Irshalgad Landslide: रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 100 पेक्षा लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Rain Alert : मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये उद्या शाळांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. ही दुर्देवी काल रात्री 10.30 ते 11 वाजता घटना घडली. या गावात सुमारे 40 घरे असून ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली.

पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी, दादा भुसे, गिरिश महाजन घटनास्थळी दाखल झाले असून, आदिती तटकरे यांच्याकडूनही कडूनही प्रशासनासह बचावकार्य करणाऱ्या पथकांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply