Rahul Narvekar : शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार की नाही? विधानसभा अध्यक्षांनी दिले निकालाचे संकेत

Rahul Narvekar on Mla Disqualification : सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. याच संदर्भात आता राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अपात्रतेचा निर्णय घेण्याची प्रक्रिया मोठी आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले आहेत की, कोणतीही चूक होऊ नये म्हणून वेळ महत्वाची आहे. पक्षात फूट असल्याचं मला कोणीही सांगितलं नाही. व्हिपचा अधिकार नेमका कोणाचा? हे आधी ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महिन्याभराच्या अपात्रेतच निर्णय घ्या, ''असं वारंवार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येता आहे. यावर नार्वेकर म्हणाले आहेत की, सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. यातच कोणी 15 दिवसांची मागणी केली, कोणी 20 दिवसांची, कोणी 2 महिन्यांची मागणी केली, याकडे मी लक्ष देत नाही.''  

राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की, व्हीपचा अधिकार नेमका कुणाला, हे आधी ठरवणार आहे. पक्षात फुट असल्याचं मला कुणीही सांगितलं नाही. फुटीबाबतचं पत्र माझ्याकडं आलं नाही, त्यामुळं पक्षात फुट, असं म्हणू शकत नाही. दोन्ही बाजूंना म्हणणं मांडायला वेळ देणार असल्याचं ते म्हणाले.

ते म्हणाले की, ''राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले ते योग्य होते. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता अन् बहुतम सिद्ध करु शकले नसते तर?'' ते म्हणाले, मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र मला हा भाग मान्य नाही. कोणतीही चूक होऊ नये यासाठी वेळ महत्त्वाचा आहे.

ते पुढे म्हणाले की, ''लवकरात लवकर घेण्याचा माझा प्रयत्न आहे. गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घेणार आहे. मात्र माझाच निर्णय अंतिम असणार आहे.''

दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांनी आज याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा म्हणून विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे निवेदन दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply