Rahata APMC Election Result : विखे पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल, थोरातांना धोबीपछाड देत राहाता बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व

Rahata APMC Election Result : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला आहे. राहाता बाजार समिती निवडणूकीत विखे पाटलांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. 18 च्या 18 जागेवर भाजपचा दणदणीत विजय झाला असून थोरात गटाचा ( मविआ ) चा दारुण पराभव झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला असून फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयी रॅली काढण्यात आली. विखे पाटीलही या जल्लोषात सहभागी झाले होते. 

काल संगमनेर बाजार समितीत थोरातांनी एकहाती सत्ता मिळवत विखेंना खातेही उघडू दिले नव्हते. आज राहाता बाजार समितीत विखे पाटलांनी परतफेड करत थोरातांना धोबीपछाड केलंय.

राहाता बाजार समितीत मविआला खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे संगमनेरमध्ये भाजपच्या मतदारांना पडलेली मते लक्षवेधी ठरली होती. याच मुद्यावरून विखे पाटलांनी थोरातांवर निशाणा साधलाय.

संगमनेरात भाजप उमेदवारांना पडलेलं मतदान थोरातांना अंजन घालणारे असून थोरातांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे..उलट राहात्यात भाजप पुरस्कृत जनसेवा मंडळावर शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला

संगमनेर तालुक्यात दहशत कुणाची आहे? तिथले लोक प्रचंड दहशतीखाली होते.. लोकांनी मतपेटीतून दहशतीला उत्तर दिलेय.. संगमनेरात आमचा पराभव झाला असला तरी मिळालेल्या मतांची संख्या जास्त असल्याचे विखे पाटलांनी म्हटलंय.

राहाता तालुक्यात आमची दहशत नाही. विधानसभेला जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य मला होतं त्याच शैल्य काही लोकांना आहे. अशा शब्दात विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.. तर पक्षाने मला दिलेल्या संधीचे सार्थक करत असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply