R Ashwin: 'कधीकधी आश्चर्य वाटतं की IPL क्रिकेटही आहे का?', अश्विनचं खळबळजनक भाष्य

R Ashwin on IPL: भारताचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. दरम्यान, 37 वर्षीय अश्विनने नुकतेच आयपीएलबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की कधीकधी आयपीएल क्रिकेट आहे, याचे आश्चर्य वाटते. आयपीएलने गेल्या 17 वर्षात केलेला विकास पाहून अश्विनने हे भाष्य केले आहे.

अश्विनने आयपीएलदरम्यान खेळाडूंना सराव आणि जाहिरांतीचे शूट यादरम्यान त्यांचा वेळ मॅनेज करण्याचे आव्हान पेलावे लागते असेलही सांगितले आहे. तो इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट होस्ट करत असलेल्या क्लब प्रेरिए फायर पॉडकास्टमध्ये बोलत होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *