Punjab Crime : १० रुपयांच्या फ्रूटीचा मोह नडला! तब्बल 8.49 कोटींची लूट करणारी 'डाकू हसीना' पोलिसांच्या ताब्यात

Punjab Crime : पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सीएमएस कंपनीत 8.49 कोटींचा सर्वात मोठा दरोडा टाकणारी मुख्य आरोपी डाकू हसीना उर्फ ​​मनदीप कौर आणि तिच्या पतीला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका १० रुपयांच्या फ्रूटीच्या मोहाने हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात अडकले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

याबाबत अधिक माहिती अशी की,पंजाबमधील तब्बल 8 कोटींची रक्कम लुटणारी ही चोर अवघ्या एका फ्रुटीमुळे पकडली गेल्याची ही घटना आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये 8 कोटींच्या चोरीची सूत्रधार ‘डाकू हसिना’ मनदीप कौर उर्फ ​​मोना हिला पंजाब पोलिसांनी पकडले आहे. ती उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी गेली असताना तिच्या पतीसह तिला पकडण्यात आले. यासाठी पोलिसांनी खास प्लॅनही आखला होता.

मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग नेपाळला पळून जाणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. नेपाळला जाण्यापूर्वी त्यांनी हरिद्वार, केदारनाथ आणि हेमकुंड साहिबची यात्रा करण्याचेही ठरवले होते. दोघेही यात्रेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यावरुन पोलिसांनी हा प्लॅन आखला आणि दोघेही यामध्ये फसले.

नेमकं काय झालं?

मनदीप कौर आपल्या पतीसोबत जसविंदर सिंग हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी गेली होती. ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांनी एक योजना आखत भाविकांना मोफत फ्रुटी वाटण्यास सुरुवात केली.

इतर भाविकांप्रमाणेच मनदीप आणि तिचा पती पोलिसांच्या स्टॉलवर पोहोचले. कोणी ओळखू नये म्हणून त्यांना तोंड झाकलं होतं. मात्र फ्रुटी पिण्यासाठी त्यांनी चेहरा उघडला आणि पोलिसांनी त्यांना ओळखून अटक केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply