Pune ZP CEO : रमेश चव्हाण पुणे झेडपीचे नवे सीईओ; आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

पुणे - महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार आहेत. आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे सीईओ चव्हाण यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. एस्सी (ॲग्रिकल्चर) ही पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे ते सन १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल सेवेत दाखल झाले.

Maharashtra Rain Alert : मुंबई, ठाण्यासह कोकणात आज तुफान पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

त्यानंतर त्यांनी सातारा व सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महसूल विभागात सहसचिव आदी पदांवर काम केले आहे. त्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली आहे.

दरम्यान, आयुष प्रसाद हे २१ जानेवारी २०२० रोजी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाले होते. तेव्हापासून त्यांनी सुमारे साडेतीन वर्ष या पदावर काम केले असून, यापैकी सुमारे दीड वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहिले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply