Pune Zilla Parishad School : पुणे जिल्ह्यातल्या १६ शाळा अनधिकृत, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Pune News: पुणे जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह. राज्यातील अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला  सर्वेक्षण करताना ही बाब आढळून आली आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यातील दोन शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनधिकृत शाळाविरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. या आदेशानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यामध्ये तब्बल १६ अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. या शाळांपैकी दोन शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील आठ शाळांकडून जवळपास ४४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तो दंड सरकार जमा करण्यात आलाय.

Pune ZP CEO : रमेश चव्हाण पुणे झेडपीचे नवे सीईओ; आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विविध शाळांच्या तपासणी केल्या गेल्या होत्या. त्या तपासणीत ५३ शाळा या अनधिकृत म्हणून आढळल्या. त्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शाळांना नोटीस पाठवून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. ५३ पैकी ३७ शाळा अनधिकृत आढळल्याने त्या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र त्या शाळांनी राज्य सरकारकडून शाळा सुरू ठेवण्याचे परवानगी मिळवली. त्यामुळे त्यातील १६ शाळांवर पुन्हा कारवाई सुरू केली.

शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात १६ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. या सर्व शाळा मुळशी, दौंड, पुरंदर, खेड तालुक्यातील असून मुळशी तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा यात समावेश आहे. त्यातील ८ शाळा अनधिकृत असल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख रुपये दंड वसूल केला आहे. शिवाय उर्वरित शाळांकडून समाधानकारक खुलासे न आल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply