Pune Zika Virus Update : पुण्यात झिका व्हायरसमुळे टेन्शन वाढलं, २० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले

Pune Zika Virus Update : पुपुण्यामध्ये झिका व्हायरसने टेन्शन वाढवले आहे. पुण्यामध्ये झिकाचे आतापर्यंत ३ रुग्ण आढळले आहेत. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे आरोग्य आरोग्य विभागाकडून  विशेष लक्ष ठेवले जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. झिकाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगर पालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आढळलेल्या झिकाच्या ३ रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या २० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हे ३ रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळले होते त्या एरंडवणा आणि मुंढवा परिसरातील २ हजार ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या परिसरामधील नागरिकांना झिका व्हायरसची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे.
 
दरम्यान, पुण्यामध्ये झिकाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आता इतर महानगर पालिका देखील सतर्क झाल्या आहेत. नाशिक महानगर पालिकेने घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. खासगी रुग्णालयांना देखील रुग्णांची माहिती कळवण्याचं बंधन केले आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात झिकाचा रुग्ण उपचार घेत असतानाही संबंधित पालिकेला माहिती न कळवण्याचा प्रकार लक्षात घेता महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांवर नजर ठेवण्याचा नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने निर्णय घेतला आहे. संशयित झिकाच्या रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून माहिती मागवण्यात आली आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply