पुणे : घोटावड्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात

पिरंगुट - घोटावडे (ता. मुळशी) येथील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएने कारवाई करायला आज सकाळी सुरुवात केली. पीएमआरडीएच्या तहसीलदार मनिषा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एकूण चार ठिकाणी ही कारवाई सुरू असून सुमारे चाळीसहून अधिक गाळे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. ही सर्व बांधकामे वाणिज्य उपयोगासाठी बांधण्यात आलेली होती. येथील हनुमान चोकातील सुमारे चाळीस दुकाने सकाळीच जमीनदोस्त करण्यात आली असून राजयोग हॅाटेलसमोरील सहा दुकानांवर कारवाई सुरू आहे. त्यानंतर शेळकेवाडी येथील अन्य काही बांधकामावरही कारवाई केली जात आहे.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *