Pune Zika Virus : टेन्शन वाढले! पुण्यात आढळला झिकाचा आणखी एक रुग्ण, पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन

Pune Zika Virus : पुण्यामध्ये झिका व्हायरसने टेन्शन वाढवले आहे. पुण्यामध्ये झिका व्हायरसची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. हडपसर परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. झिका व्हायरचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढ होत चालल्यामुळे पुणे महानगर पालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे शहरात झिका व्हायरसचा संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. हडपसर परिसरात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला रुग्ण आढळला आहे. या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता प्राथमिक तपासणी अहवालामध्ये या व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३ वर पोहचली आहे. बुधवारी पुण्यातील एरंडवणा परिसरात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते.

Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

बुधवारी पुण्यातील एरंडवणा परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले होते. तपासणी अहवालामध्ये त्यांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. दोघांवर देखील उपचार सुरू आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत पण त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. पुणे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. झिका व्हायरस मच्छरांमुळे होतो. झिका व्हायरसमुळे डोकेदुखीची लक्षणे जाणवतात. त्याचसोबत स्नायू जड होतात, स्नायू दुखतात, हिरड्या दुखतात आणि शरीरावर बारीक पुरळ येतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply