Pune Zika : पुणेकरांचे टेन्शन वाढलं! पुरानंतर झिकाच्या रुग्णात मोठी वाढ, एका दिवसात ७ नव्या रुग्णांची नोंद

Pune Zika : पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. पुण्यावरील झिकाचे सावट काही कमी होत नाहीये. पुण्यामध्ये पुन्हा झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात झिकाच्या ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहचली आहे. अशामध्ये पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. झिकाचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एकाच दिवशी झिकाचे ७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील पुरानंतर झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. एकाच दिवशी आढळून आलेल्या ७ रुग्णांपैकी ६ गर्भवती महिलांचा समावेश आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात ४ रुग्ण आढळून आले असून त्यांतील तीन गर्भवती महिला आहेत. तर खराडी परिसरात ३ गर्भवतींना झिकाची लागण झाली आहे. पुणे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहचली आहे. यामुळे पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

Pune News : कुरिअर सर्विसमधून फोन, आधार कार्ड वापरल्याची माहिती, नंतर पोलिसांच्या मदतीचा बनाव; पुण्यात महिलेसोबत काय घडलं?

झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखाच डान्सांमुळे होणारा आजार आहे. एडिस डासांमुळे झिका आजार होता. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. गर्भवती महिलांना झिकाची लागण झाल्याच त्यांच्या गर्भात असलेल्या नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो. यामुळे गर्भवती महिलांना तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

झिकाची लागण झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. तसंच त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या इतरांनी रक्त तपासणी करून घ्यांवी असे आवाहन देखील केले जात आहे. पाऊस, साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे झिकाचा प्रसार होत आहे. झिकाची लागण झाल्यास ताप, अंगावर पूरळ, सांधेदुखी, पुरळ, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा, उलट्या यासारखी लक्षणं आढळून येतात. झिका रुग्णांनी आराम करावा, डिहायड्रेशन टाळावे, भरपूर पाणी प्यावे, ताप आणि वेदना शमण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावीत असा सल्ला दिला जातो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply