पुणे : ‘पुष्पा’मधील गाणं म्हणत पुण्यात महिलेचा विनयभंग; भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेकडे पाहून लज्जास्पद वर्तन

पुणे : पुष्पा चित्रपटातील गाणे म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वप्नील अरुण वांजळे (वय ३०, रा. रायगड काॅलनी, न्यू अहिरे गाव, वारजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला रात्री आठच्या सुमारास भाजी खरेदी करुन रायगड काॅलनीतून जात होती. त्या वेळी वांजळे सोसायटीच्या परिसरात थांबला होता. वांजळेने महिलेकडे पाहून पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक शर्फी’ हे गाणी म्हटले. महिलेकडे पाहून त्याने लज्जास्पद वर्तन केले.

महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वांजळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक शेलार तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *