Pune Weather Update : पुणेकरांनो, थंडी होणार तीव्र! ‘या’ तारखेपासून पारा सुमारे १० °C पर्यंत घसरण्याची शक्यता

Pune : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कायम आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात गुरुवार (ता. ४) ते रविवार (ता. ७) दरम्यान किमान तापमान १२ ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यानंतर सोमवारपासून (ता. ८) पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होऊन ते १० अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा अजूनही कायम आहे. या आठवड्यात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Pune : खाकीला कलंक! सख्ख्या भावासाठी ‘मुन्नाभाई’गिरी; 9 वर्षांपूर्वीची डमी परीक्षा उघडकीस, पोलिसच पोलीस कोठडीत

दरम्यान, बंगालच्या उपसागरात 'डिटवाह' चक्रीवादळाचे कमी दाब क्षेत्र उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. उत्तर केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय आहे.

पुण्यात हवेली येथे ९.७ अंश सेल्सिअस असे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर शिवाजीनगर (११.५), पाषाण आणि तळेगाव (११.०), आंबेगाव (११.९) येथे १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी किमान तापमान नोंदविण्यात आले. तर कोरेगाव पार्क (१५.३), लवळे (१६.०), चिंचवड (१५.४), वडगाव शेरी (१६.४), मगरपट्टा (१६.७) येथे १५ ते १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *