Pune Weather Update : पुणे जिल्ह्यात उकाडा वाढला अनेक ठिकाणी पारा ४० शी पार

Pune  : आग ओकणारा सूर्य आणि ढगाळ हवामानामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्याचे चित्र आहे.

दिवसासह आता रात्रही अधिक उष्ण असून, रविवारी (ता.३१) आकाश दुपारनंतर ढगाळ आणि रात्र उबदार राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यातील किमान तापमान हे २२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून, दिवसभर ढगाळ हवामानामुळे रात्री मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे.

Sunetra Pawar : मोठी बातमी! बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

राज्यभरात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेचा जिल्ह्यातही परिणाम जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात सरासरी किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

तर सर्वात कमी कमाल तापमान हे लोनावळा येथे ३४ अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात उकाडा कायम राहील. या काळात ढगाळ वातावरणाचा शेती आणि निगडीत व्यावसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply