Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जरा जपूनच वापरा; मंगळवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply : पुणेकरांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंगळवारी पश्चिम पुणे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी जलवाहिनीशी निगडीत काही कामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या जलवाहिनी तसेच कोंढवे-धावडे टाकी येथील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

विशेष बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी देखील या भागात सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावी. तसंच पाण्याचा कमी वापर करावा, असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून  करण्यात आलं आहे.

Loksabha Election : लोकसभा डोळ्यापुढं ठेवूनच राजू शेट्टींचं ऊसदराचं आंदोलन, गेली चार वर्षे का सुचलं नाही? ज्येष्ठ नेत्याचा सवाल

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा कोथरू़ड, डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, बालेवाडी, पाषाण या भागातील या भागातील पाणी पुरवठा सुरू रहाणार आहे.

दुसरीकडे पर्वती एम एल आर टाकी परिसरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इत्यादी भागातील पाणीपुरवठा बंद राहिल.

पर्वती एच एल आर टाकी परिसरातील सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, परिसरासह शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply