Pune : राजेंद्र हगवणेचा नवा प्रताप समोर, ५१ तोळं हुंडा घेतलाच, पण लग्नात दीड कोटींचा खर्च करायला लावला

Pune Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हागवणे हंडुबळी प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या लग्नात वडिलांनी ५१ तोळे सोनं, चांदी आणि महागडी गाडी दिल्याचं समोर आले होते. पण आता यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांना लग्नात दीड कोटींचा खर्च करायला लावल्याचं समोर आले आहे. लग्नाच्या स्टेजलाच फक्त २२ लाख खर्च करायला लावले होते. धक्कादायक म्हणजे १० लाख रूपयांचे अलिशान रिसॉर्ट रेंटवर घ्यायला लावल्याचे समोर आलेय.

वैष्णवी हागवणेच्या आत्महत्येनंतर बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चर्चा होतेय. हा कोट्यवधींचा खर्च म्हणजे हुंड्याचा नवा प्रकार मानला जातोय. त्याचे दुष्परिणाम समाजावर होण्याची भीती व्यक्त होतेय. वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी एक्कावन्न तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलाच. त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला होता .

Mumbai Rain : मुंबईकरांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी; घराबाहेर पडताना घ्या काळजी

वैष्णवीच्या लग्नासाठी तब्ब्ल दहा लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले .

लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च करायला लावले .

पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं . एक व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च करायला लावले .

पाहुण्यांचे सत्कार - स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला .

अशाप्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला .

फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणे पाच जणांना भोवले

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणां विरोधात बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव,तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या पाचही जणांना बावधन पोलिसांनी अटक केली.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply