Pune : दिवाळी सुट्टी संपता परतीच्या प्रवाशांची गर्दी; पुणे-पिंपरीच्या प्रवेशद्वारांवर प्रचंड कोंडी

Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रवेशद्वारांवर रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दिवाळीची सुट्टी संपल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्याकडे परतत होते, त्यामुळे शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, जुना बोगदा, खेड शिवापूर टोलनाका, लोणी काळभोर-सोलापूर महामार्ग, वाघोली, केसनंद, शिक्रापूर नगर रस्ता, भोसरी, चाकण औद्योगिक क्षेत्र, किवळे-देहूरोड चौक, भूगाव आणि लोणावळा परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली. काही ठिकाणी वाहने एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगेत उभी होती. केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांपर्यंतचा वेळ लागत होता.

Pune : कात्रज बोगदा ते वारजेपर्यंत भीषण वाहतूक कोंडी! पुणेकर दीड तासांपासून अडकले

रस्त्यांचे सुरू असलेले काम, अरुंद मार्ग आणि अडथळे हे कोंडीचे प्रमुख कारण ठरले. विशेषतः कात्रज बोगदा व नवले पुलाजवळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. भोसरी-चाकण औद्योगिक पट्टयात कंटेनर आणि मालवाहू ट्रकांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली.

वाहनसंख्या झपाट्याने वाढत असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा न झाल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा वाहतूक तज्ज्ञांनी दिला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *