Pune Traffic Diversion : पुण्यात 'या' रस्त्यावरील वाहतूकीत मोठा बदल; कोणता रस्ता सुरु, कोणता बंद?

Pune Traffic Diversion : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही (Traffic Diversion In Pune) रोज शिवाजी नगरचा रस्ता येण्याजाण्यासाठी वापरत असाल तर त्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने शुक्रवार (17 मे) पासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. यादरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी, के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक, हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे.

असे आहेत बदल
-वीर चापेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार (पर्यायी मार्ग चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने -सर्व्हिस रस्त्यावरून चापेकर चौक - डावीकडे वळण घेऊन न. ता. वाडी - उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक)
-फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चापेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
-न. ता. वाडी चौक ते चापेकर चौक प्रवेश बंद राहील.

Mumbai : गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून


-स. गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे प्रवेश बंद राहील.
- शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून येऊन एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
-सिमला ऑफिस चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने जाऊन चापेकर उड्डाणपुलावरून जावे.
-वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

पुण्यात मेट्रोचं काम अनेक ठिकाणी सुरु आहे. या मेट्रोच्या कामामुळे अनेक परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी अनेकांना ऑफिस्या वेळी तात्कळत बसावं लागतं. त्यात कामामुळे अनेकदा रस्ते बंद करण्यात येतात किंवा वाहतूकीत बदल करण्यात येतो. त्यावरदेखील पुणेकर नाराजी व्यक्त करताना दिसतात. पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोचं विस्तारीकरण झालं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा समस्यांना पुणेकांना तोंड द्यावं लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply