
Pune : पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर होणारी संभाव्य गर्दी आणि सुरक्षेचा विचार करून पुणे वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागांतील वाहतूक रचनेत मोठे फेरबदल केले असून हे बदल १४ ते १६ जानेवारी या कालावधीत लागू राहणार आहेत.
निवडणुकीच्या काळात मतदारांना केंद्रावर पोहोचताना कोणताही अडथळा येऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत पुण्यातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रामुख्याने जड आणि खाजगी वाहनांना या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.

ZP Election Date : जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा आहे निवडणूक कार्यक्रम
हडपसर आणि कोरेगाव पार्क भागात निर्बंध
हडपसर भागात मतदानाची प्रमुख केंद्रे असल्याने साने गुरुजी परिसराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद असेल. येथील वाहनधारकांनी पर्याय म्हणून माळवाडी डी.पी. रस्ता किंवा अमरधाम स्मशानभूमी मार्गाचा अवलंब करावा. दुसरीकडे, कोरेगाव पार्कमधील व्हीआयपी हालचाली लक्षात घेता नॉर्थ मेन रोड (लेन 'सी') आणि बंडगार्डन घाट परिसर बंद राहील. नागरिकांनी प्रवासासाठी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मुख्य रस्त्याचा वापर करावा.
मध्यवर्ती पेठा आणि विमाननगरमध्ये बदल
समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या पॉवर हाऊस चौक, संत कबीर चौक आणि रामोशी गेट परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागातील प्रवाशांना क्वार्टर गेट आणि सेव्हन लव्हज चौकातून वळवण्यात आले आहे. तसेच, विमाननगरमधील फिनिक्स मॉलचा मागील भाग आणि निको गार्डन परिसरातील रस्ते बंद असून, श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदिर चौकातून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
विश्रामबाग आणि दत्तवाडी परिसरात कडेकोट बंदोबस्त
शहराच्या मध्यवर्ती भागातील पुरम चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद राहील. नागरिकांनी शास्त्री रस्त्याचा वापर करून दांडेकर पुलामार्गे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सारसबाग खाऊ गल्ली आणि बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा परिसरही वाहतुकीसाठी बंद असेल.
दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel


1 thought on “Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मतदानासाठी आजपासून वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ मार्ग बंद”