Pune Traffic : पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई; २० हजार रुपयांचा दंड वसूल

Pune Traffic - कात्रज चौकात व परिसरातील बेशिस्त व वाहतूक नियम न पाळणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अवैध रिक्षा चालकांवर भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

कात्रज चौक परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने नो-पार्किंग नो-हॉल्टिंग करण्यात आले आहे. या चौकात अनेक रिक्षा चालक खाजगी पार्किंग असल्यासारखे गाड्या लावत असतात. संबधित रिक्षाचालकांना सूचना देऊनही फरक पडत नसल्याने एमव्ही अॅक्टअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली

या माध्यमांतून एकूण २७ रिक्षा चालकांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कात्रज चौकात वाहतुकीची मोठी वर्दळ असते.

वारंवार सूचना देऊनही रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा कमी होत नव्हता. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत असल्याचे लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळी कणसे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply