पुणे :दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी तीन कोटी ६५ लाखांचा निधी प्राप्त ; जिल्ह्यातील कामे सुरू

सन २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २३ गावांत दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे विविध सर्वेक्षणात समोर आले आहे. या गावांमध्ये संरक्षणात्मक, दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी तीन कोटी ६५ लाखांचा निधी प्राप्त झाला असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

दरड कोसळल्याने ३० जुलै २०१४ रोजी ‘माळीण’ या गावात मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये १५१ जणांचा बळी गेला होता. या गावाचे पुनर्वसन करुन नव्याने पुन्हा गाव उभे करण्यात आले आहे. माळीणच्या दुर्घटनेनंतर या गावाप्रमाणे धोकादायक असलेल्या जिल्ह्यातील गावांची पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार माळीण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी संस्थांमार्फत प्रत्येकी दोनदा, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत (सीईओपी) एकदा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र अहवाल देखील सादर करण्यात आले आहेत.

दरम्यान, संबंधित गावांमध्ये डोंगर उतारावर चर काढणे, धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे किंवा डोंगरकड्यास स्थिर करणे, बांबूच्या झाडांची लागवड करणे अशी आवश्यक आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने कामे करण्यात येत आहेत. तसेच या गावांमध्ये संरक्षक भिंत उभारणे, गावामध्ये पावसाचे पाणी येण्याची भीती असल्यामुळे ते पाणी बाहेर काढून घेण्यासाठी बांध घालणे ; मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळल्यास गावावर कोणतीही आपत्ती कोसळू नये यासाठी बांबूच्या झाडांची लागवड करणे, ज्यामुळे डोंगरावरून पावसामुळे वाहून येणारी माती बांबूच्या झाडांमध्ये अडकू शकते. याशिवाय ज्या गावांच्या आसपास असलेल्या डोंगरकडा कोसळण्याची शक्यता असल्यास तो तोडणे किंवा संबंधित डोंगरकड्यास स्थिर करणे, अशी सुचविलेली कामे प्रगतीपथावर आहेत.

तालुका आणि धोकादायक स्थितीतील गावे

मुळशी – घुटके, मावळ – भुशी, मालेवाडी, सावळे, माऊ, लोहगड, ताजे, बोरज, तुंग, भोर – धानवली, कोले (जांभवली), डेहणे, पांगरी (सोनारवाडी), आंबेगाव – भगतवाडी, माळीणअंतर्गत पसारवाडी, आसणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी क्रमांक एक आणि दोन, पेंढारवाडी, जुन्नर – निमगिरीअंतर्गत तळमाची वाडी, खेड – भोमाळे, भोरगिरेअंतर्गत पदरवस्ती आणि वेल्हा – आंबवणे, घोल



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply