Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला! वाहतूक कोंडी अन् बत्तीही गूल

पुणेः पुणे शहरामध्ये अचानकपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसत आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस सुरु झाला आहे. नवी पेठ, डेक्कन, गरवारे महाविद्यालय भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अंदाज दिला होता. पुढील २, ३ दिवस पुण्यासह काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार पावसाला सुरुवात झालीय.

सारसबाग, सिंहगड रोड, सेनापती बापट रोड, एरंडवणे भागात पाऊस सुरु झाला आहे. यासह औंध परिसरातही पावसाला सुरुवात झालीय.

पावसाचे अपडेट्स...

  • वारजे, कोथरूडमध्ये तुरळक सरी

  • सदाशिव पेठ, टिळक रोड परिसरात पाऊस

  • धानोरी, भैरवनगर मध्येही पाऊस सुरू

  • टिंगरे नगर, विश्रांतवाडीमध्येही पाऊस

  • दांडेकर पुलाजवळ पावसाचा जोर वाढला



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *