Pune Rain Update : पुण्यात सकाळपासूनच पावसाची संततधार; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Pune Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशातच राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान काल शनिवार (ता.7) संध्याकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या पावसाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात हजेरी लावली. आकाश मुख्यतः ढगाळ असून शहर व उपनगरात अनेक ठिकाणी हलक्या सरीना पहाटेपासूनच सुरवात झाली आहे.

पावसामुळे उष्णता कमी झाल्यामुळे वातावरण थंड झाले आहे. तर मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे मोठे नुकसान झालं आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply