Pune Rain : पुण्याला पावसाने झोडपले; घरांमध्ये शिरले पाणी; विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, ४५ ठिकाणी पडली झाडे

Pune : रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही सोसायट्या आणि वस्त्यांमधील घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवानांकडून पाणी शिरलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. भिडे पुलाजवळ विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तसेच, मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या

शहरात मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला रणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. वारजे परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सायटीत, शिवणेतील सदगुरू सोसायटीमध्ये,

Pune Rain : ताम्हिणीत महाविक्रमी ५५६ मिमी पाऊस, आदरवाडी येथे दरड कोसळुन ताम्हिणी- कोलाड रस्ता बंद, एकाचा मृत्यु

महंगड रस्त्यावरील सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर तीन सोसायट्यांमध्ये तसेच नदीपात्रातील रस्ता रजपूत बीटभट्टीजवळ, गंजपेठ, चांदतारा चौक शिवाजीनगर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

- भवानी पेठेतील गुळ आळी, वटेश्वर भुवन येथे मोठे झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद, झाडाखाली काही वाहने अडकली आहेत.

- वडगाव बुद्रूक, महापालिका मैदान येथे भिंत कोसळली,

- हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी, येत असल्याने घरात पाणी शिरले,

- वडगाव शेरीतील आनंदनगर बस थांब्याजवळ एका वाहनावर झाड कोसळले, सुदैवाने वाहनातील शाळकरी मुलेआणि वाहनचालक सुरक्षित.

- शहरात मागील २४ तासांत आज सकाळी सात वाजेपर्यंत ४५ झाडे पडली

- भवानी पेठेत वाड्याची भित पडली.

-कोरेगाव पार्क, बर्निंग घाटाजवळ भिंत पडली.

बावधन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने वाहने अडकली.

- पुलाची वाडी परिसरात वस्तीत पाणी शिरल्यामुळे घावरलेल्या नागरिकानी ससारोपयोगी सामान सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply