Pune Rain News : विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Pune Rain News : पाऊस पडताना होणारा विजेच्या कडकडाट आपण सर्वांनी ऐकला असेल.विजेचा आवाज ऐकल्यातरी अनेकांना धडकी भरत असते. पुण्यातील उरुळी कांचन येथे विज पडल्याच्या आवाजाने एका वृद्ध महिलाचे मृत्यू झालाय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल जोराचा वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह उरुळी कांचन परिसरातही पाऊस झाला.

पाऊस सुरू झाल्याने शेतात काम करणाऱ्या ११ महिला आडोशाला थांबल्या होत्या. या महिला जेथे थांबल्या होत्या, त्यांच्या बाजुलाच विज पडल्याचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून तीन महिला भेदरल्या. यातील एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर दोघीजण किरकोळ जखमी झाल्यात. सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास खामगाव टेक (ता. हवेली) शिवारात ही घटना घडलीय.

Avinash Bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

अंजना बबन शिंदे (वय - ६५रा. शिंदवणे, ता. हवेली) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनीता महादेव डोंगरे (वय- ५६), व संध्या गाडेकर (वय -४५, रा. दोघीही, पांढरस्थळ, उरुळी कांचन, शिंदवणे रोड, ता. हवेली) अशी किरकोळ जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंजना शिंदे आणि त्यांच्या बरोबर उरुळी कांचन, शिंदवणे परिसरातील ११ महिला या शेतातील कामानिमित्त खामगाव टेक या ठिकाणी शेतातील कामे करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काम संपवून घरी निघाल्या असतानाच अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने सर्वजण एका आडोशाला थांबल्या.

नेमके याच वेळी ते ज्या ठिकाणी थांबले होते त्यांच्या काही अंतरावर असलेल्या ठिकाणी वीज कडाडली. या विजेच्या मोठ्या आवाजाने तीन महिला जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर या महिलांना खासगी वाहनातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य या ठिकाणी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. तर जखमी असलेल्या सुनीता डोंगरे व संध्या गाडेकर यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं.

दरम्यान, यावेळी उपचारादरम्यान अंजना शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शिंदे यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेने शिंदवणेसह परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply