Pune Railway Station : २ नवे फ्लॅटफॉर्म, ४ फलाटाचा विस्तार, ३०० कोटींमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार!

Pune Railway Station News : प्रवाशांची वाढती गर्दी आणि एक्स्प्रेसची वाढती संख्या पाहाता पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे रेल्वे स्थानकावर दोन नवीन फ्लॅटफॉर्म होणार आहेत. त्याशिवाय चार फ्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला आहे. पुढील काही दिवसांत याची निविदा निघेल अन् कामाला सुरूवात होईल, असे सांगण्यात येतेय.

पुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज 200 हून अधिक गाड्या आणि 150,000 हून अधिक प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांची संख्या आणि गाड्याची संख्या ही स्टेशनची सध्याची क्षमता पुरेशी ठरत नाही. पुण्याहून उत्तर भारत तसेच मुंबईसाठी दररोज रेल्वे गाड्या धावतात. प्रवाशांची गर्दी पाहता अनेक वेळा काही जणांना त्यांची ट्रेन मिळत नाही. याच प्रवासी संख्येचा ताण कमी होण्यासाठी हे अतिशय दोन महत्त्वाचे निर्णय मानले जात आहेत. दररोज पुणे रेल्वे स्थानकावरून १.५ लाख प्रवासी प्रवास करतात.

फलाट विस्तारीकरण आणि २ नव्या फलटाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. २४ डब्यांच्या गाड्यांसाठी ४ फलाट यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी ३०० कोटी खर्च अपेक्षित असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर एकूण ६ फलाट आहेत. विस्तारीकरण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट संख्या ८ होईल. पुढील काही दिवसांत पुणे रेल्वे स्टेशनच्या विस्ताराच्या कामाची सुरूवात होईल.

Pune News : २०२५ च्या पहिल्याच रात्री ८५ मद्यपींना अटक, मद्यपान करून गाडी चालवणे पडले महागात

पुणे रेल्वे स्टेशनचा कायापलट होणार -

रेल्वे स्टेशनमधील यार्डजवळ दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाटाची संख्या त्यामुळे सहावरून आठ इतकी होईल. दोन नव्या प्लॅटफॉर्ममुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील भार थोडासा हालका होईल. गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. दोन नवे फलाट तयार करण्यासोबतच चार सध्याच्या फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. यार्ड रीमॉडेलिंगला २०१६-१७ मध्ये मध्ये मंजूरी मिळाली होती. परंतु विलंबाने यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनवरील या कामामुळ स्थानकाचा कायापलट होणार आहे.

खर्च किती होणार?

पुणे रेल्वे स्टेशनच्या पूर्ण विस्ताराचा खर्च तब्बल ३०० कोटी रूपये इतका असेल. यासाठीच्या निविदा प्रक्रिया आधीच सुरू झाल्या असून अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच स्थानकाचे काम सुरू होईल.

फायदा काय होणार?

फलाटाची संख्या वाढल्याने विस्तारामुळे रेल्वेचे वेळापत्र सुधारेल. लांब पल्ल्याच्या 24 डब्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगली सोय मिळेल.

दोन नवीन मुख्य मार्ग मालगाड्यां धावण्यासाठी सोयीस्कर होतील. वेळेची बचत होईल आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल. अपग्रेड केलेल्या पायाभूत सुविधांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक सेवांच्या वाढत्या मागणीला अनुसरून गर्दी कमी होईल.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply