Pune Railway : रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई; पुण्यात 6 लाखांचा दंड वसूल

Pune Railway : पुण्यात रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जातेय. रेल्वे मार्गावरील गाड्यांतुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. पुणे रेल्वे विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात२७ हजार ८०१ फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र केलीय. जानेवारी महिन्यात विनातिकीट, अनियमित तसंच सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या २७ हजार ८०१ जणांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आलाय. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी ६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

Accident News : पुण्यात दोन अपघातांत ३ ठार, २ गंभीर जखमी

१ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल

पुणे विभागाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवासी , अनियमित प्रवास आणि सामान नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २७ हजार ८०१ प्रवाशांकडून १ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या महिन्यात या मोहिमेत तिकीट तपासणी दरम्यान १९ हजार ८५९ प्रवासी प्रवास करताना आढळून आले.

रेल्वे कायद्यांतर्गत दंड

रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्यानं सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलंय. विनातिकीट प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. अन्यथा दंड न भरल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो.

विनातिकीट प्रवास कायद्याने गुन्हा

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना चांगलाच आळा बसणार आहे.

प्रवाशांनी  तिकिट काढून आरामदायी प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. विनातिकीट प्रवास करणं हा कायदेशीर गुन्हा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply