pune porsche case : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात

pune porsche case : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात मोठी ट्विस्ट समोर आला आहे. पुणे पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे डॉ. श्रीहरी हाळनोरने मान्य केले. या कृत्यासाठी डॉ. अजय तावरेचा दबाव होता. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नात होतो, असं डॉ. श्रीहरी हाळनोरने सांगितले.

पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेचा दबाव होता, त्यामुळे रक्ताचे नमुने बदलले, असे डॉ श्रीहरी हाळनोरने कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे.

Navapur News : नवापूर तालुक्यात कडकडीत बंद; आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी जलद कारवाईची मागणी

या घटनेनंतर डॉ हळनोर आत्महत्येच्या प्रयत्नात होता. डॉ हळनोरने रक्ताचे नमुने बदलल्यानंतर ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माफीनामा दिला होता. या प्रकरणात माझी चूक झाली, माझ्यावर दबाव होता, अशी कबुली डॉ हळनोरने दिली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply