Pune Porsche Car Accident : मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही; दमानियांच्या आरोपांवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

Pune Porsche Car Accident : मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, पुरावे द्या,असं रोखठोक उत्तर अजित पवार यांनी अंजली दमानियांच्या आरोपांवर दिलेत.पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अजित पवारांनीच पुण्यातील सीपींना फोन केला होता,असा आरोप दमानिया यांनी केला होता.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय. या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

Pune Porsche Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक

पुण्यात हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर आपण एक ट्विट केलं होतं, असं अंजली दमानिया म्हणाल्यात. आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवारांनीच पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा सवाल दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरून पत्रकार परिषदेत अजित पवारांना प्रश्न करण्यात आला.त्यावेळी अजित पवारांनी दमानिया यांना रोखठोक उत्तर दिलंय.

लोक प्रतिनिधी म्हणून शहरात घटना घडल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर तेथील प्रमुखांना सुचना द्यावा लागतात. जर पत्रकार म्हणून तुम्ही मला माहिती दिली तर मी तेथील प्रमुखांना फोन करून त्या प्रकरणी माहिती घेतो. जर घटना पुण्यात घडली असेल तर पुणे आयुक्तांशी संपर्क साधतो. जर घटना पिंपरी-चिंचवड येथील असेल तर तेथील आयुक्तांना फोन करुन सांगतो. लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून मी शिपाई, पीआयला फोन करत नाही.

गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे, पण अशा प्रकारच्या कोणत्याच घटनेत कोणाला वाचवण्यासाठी फोन करत नाही, अशी घटना घडली असेल तर कोणाला पाठीला घाला, असं कधीच मी सांगत नाही. पण उलट तेथे जर मी दोषी असेल तरी कारवाई करा असे शब्द माझे असतात, असं उत्तर अजित पवारांनी पत्रकाराच्या प्रश्नाला दिलं.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून कोणत्याच दबावाला बळी पडू नका, असं सांगितलं. एका श्रीमंत बापाच्या मुलगा या घटनेला कारणीभूत आहे, त्यामुळे या प्रकरणात कोणत्याच राजकीय दबावाला बळी पडू नका अशा सूचना मी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात पोलिसांना आर्थिक प्रलोभन दिलं जाऊ शकतं, त्यामुळे पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी,अशा सूचना आयुक्तांना दिल्यात, असं अजित पवार म्हणालेत.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही दिलीय. मी सुद्धा सांगितलंय की, याप्रकरणात कोणतीच हयगय करू नये, असं सांगितलं. जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय.या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिलीय.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply